1 ). tablet school...! -
वाडीतील पहिले
शिक्षक गोरे गुरुजी यांचे बारावे पुण्यस्मरण धुमधडाक्यात करण्याचे त्यांच्या मुलांनी
ठरवले होते हे समजल्यावर आम्ही त्यांची भेट घेऊन तुमच्या कुटुंबाचा समाजामध्ये
कायम स्वरूपी आदर्श कसा राहील याची जाणीव करून दिली व या जगात असून ही जगाशी
संपर्क नसलेल्या या माणसांचा व मुलांचा विचार करून त्यांची तंत्रज्ञानाशी नाळ
जुळवण्यासाठी गोरे कुटुंबाकडून प्रती दोन विद्यार्थ्या मागे एक tablet घेऊन गोरे
कुटुंबाच्या दातृत्वातून दुर्लक्षित शाळा सिन्नर तालुक्यातील पहिली tablet युक्त
शाळा बनली व वाडीत तोपर्यंत कधीही कोणतेही अधिकारी व पदाधिकारी फिरकूनही पाहत
नव्हते त्या वाडीत मा.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते tablet वितरण करण्यात आले.
या सर्व सोहळ्याचा आनंद वाडीतील पुरुष व महिलांच्या चेह-यावर ओसांडून वाहत होता व
या नाविन्यपूर्ण उपक्रमातून माळावरील शाळेत बसून मुले जगाची सफर करू लागली.
*********************************************************************************
2 ). " साद माणुसकीची...! " -
सन २०१९ – २० मध्ये शाळेचे दुसरे पर्व सुरु झाले व माझे
जुने सहकारी यांची बदली होऊन श्रींम.सुनीता सोनवणे यांच्या रूपाने शाळेला नवीन
मुख्याध्यापक मिळाले . त्यांच्या मदतीने ही नवीन वर्षाची सुरुवात हि धुमधडाक्यात
केली व “ साद मानुसकीची ” हा उपक्रम
सुरु केला.
उपक्रम सुरु करण्यामागचा हेतू असा होता की , वाडीतील सर्व लोक मोल
मजुरी करत असे विद्यार्थ्यांना वह्या किंवा इतर लेखन साहित्य किंवा शालेय
उपयुक्त वस्तू वेळेवर मिळत नसे किंवा काही पालक घेत हि नसत व घ्यायचे ठरले
तर किमान २ की.मी. अंतरावर जाऊन शेजारच्या गावातून खरेदी करावे लागत असे त्या
जाण्यास टाळाटाळ करत व त्याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवर दिसून येऊ लागला .
या उपक्रमा अंतर्गत होतकरू सामाजिक कार्य
करणारे व वाडीशी संबधित असणारे या सर्व लोकांची एकत्रत मोट बांधत सोशल मिडीयावर एक
समूह तयार करण्यात आला व विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी या चर्चा करण्यात आली.
या समस्या ला साद घालत एक सेवा निवृत्त शिक्षक श्री. अशोक गोरे यांनी शाळेच्या
पहिल्याच दिवशी सर्व मुलांना दप्तर , सर्व इयेत्ते नुसार वह्या व इतर शालेय उपयुक्त वर्षभर पुरेल एवढे साहित्य वाटप केले व दर वर्षी
देण्याचे कबूल करून त्यांनी ही समाजा
पुढे एक नवा आदर्श निर्माण केला .
3 ). " वेध अंतराळाचा..! " -
या बरोबर शाळेत अनेक सहशालेय उपक्रम राबविले जात असत त्यामधील “ वेध अंतराळाचा ” हा एक उपक्रम यामध्ये नासा माफर्त “मंगळ यान २” हे यान अवकाशात मंगळ ग्रहावर झेप घेणार असून त्यासाठी नासाने हा उपक्रम सुरु केला की, online नोंदणी करून विद्यार्थ्याना बोर्डिंग पास नासा कडून उपलब्ध करून देण्यात आले व ज्यांची नोंदणी झाली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे त्या यानावर एका चीप वरती लिहिले जानार असून ती नावे मंगळ ग्रहावर जाणार आहेत .
या उपक्रमा चा हेतू फक्त विद्यार्थ्यांना अंतराळा बद्दल माहिती व्हावी एवढाच आहे .
***************************************************************
No comments:
Post a Comment